maharashtra ssc board exam SAKAL
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांनो अभ्यास करा! बोर्ड परीक्षेत शहरातील शिक्षक ग्रामीणमध्ये अन्‌ ग्रामीणमधील शिक्षक शहरातील केंद्रांवर पर्यवेक्षक; प्रत्येक केंद्रावर बैठे पथक, जिल्ह्यासाठी ७ भरारी पथके

मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमानुसार परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झाले. शहरातील परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक आता ग्रामीण तर ग्रामीणमधील केंद्रांवरील शिक्षक शहरातील केंद्रांवर असणार आहेत. त्यासाठी किमान पाच कि.मी. अंतराचा निकष लावला जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा आता काही दिवसांवर आली असून, आज (शुक्रवारी) शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमानुसार परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झाले. शहरातील परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक आता ग्रामीण तर ग्रामीणमधील केंद्रांवरील शिक्षक शहरातील केंद्रांवर असणार आहेत. त्यासाठी किमान पाच कि.मी. अंतराचा निकष लावला जाणार आहे. आपल्याच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तेथील शिक्षक आता पर्यवेक्षक नसणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या २२ ऑगस्टच्या निर्णयानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले. शासन निर्णयानुसार एकाच महिन्यात सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देऊन वेळप्रसंगी शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, चार महिन्यानंतरही बहुतेक शाळांमधील वस्तुस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांचीच अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पर्यक्षकांची ड्यूटी ज्या केंद्रावर असेल, तेथे त्यांच्या शाळेतील विद्यार्थी नसतील, असे नियोजन आहे. दरम्यान, या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे, पण मुख्यमंत्र्याच्या १०० कलमी कार्यक्रमात हा मुद्दा समाविष्ट असल्याने तो रद्द होणे अशक्य असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील पाच हजार केंद्रांवर दहावी व बारावीचे जवळपास २५ लाख विद्यार्थी परीक्षा देतील. बारावीचे प्रात्यक्षिक २४ जानेवारीपासून सुरु झाले असून, या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आता ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरु होत असून लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पुणे विभागाची परीक्षेची तयारी

  • दहावीसाठी परीक्षा केंद्रे : ६६०

  • एकूण परीक्षार्थी : २,७०,४००

  • बारावीसाठी परीक्षा केंद्रे : ४३२

  • एकूण परीक्षार्थी : २,४७,७००

  • भरारी पथके : प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ पथके

कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस नियोजन

कॉपीमुक्त परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक अदलाबदल केले जाणार आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, त्यानुसार नियोजन केले जाईल. याशिवाय प्रत्येक केंद्रांवर बैठे पथक व प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असतील.

- औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय मंडळ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT