Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता तीन महिने आधीच परीक्षेचे वेळापत्रक समजणार आहे. ऐनवेळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते, पुन्हा त्यात बदल होतो. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आता महत्त्वाचा बदल केला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता तीन महिने आधीच परीक्षेचे वेळापत्रक समजणार आहे. ऐनवेळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते, पुन्हा त्यात बदल होतो. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आता महत्त्वाचा बदल केला आहे.

सोलापूर विद्यापीठात पाच संकुले असून, त्या अंतर्गत सुमारे ५००० विद्यार्थी शिकतात. तर १०९ संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुमारे ६५ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. सत्र सुरू झाल्यानंतर ९० दिवसांत परीक्षा घेतली जाते. परंतु, अनेकदा ९० दिवस पूर्ण होण्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर होते आणि विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येतो. त्यातून अनेकदा विद्यार्थी संघटना विरोध करतात आणि परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागते. पण, आता तसा प्रकार कायमचा बंद होणार आहे.

विद्यापीठ आता शैक्षणिक सत्र झाल्यानंतर त्याच महिन्यात आगामी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. यंदाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. डिसेंबरपर्यंत परीक्षा संपली की शैक्षणिक वर्षातील शेवटची सत्र परीक्षा मार्चअखेर घेता येईल, जेणेकरून शैक्षणिक वर्षाची सुरवात वेळेत होऊ शकेल, असा त्यामागील उद्देश असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

सोलापूर विद्यापीठाचा पसारा

  • एकूण संकुले

  • ११

  • प्रवेशित विद्यार्थी

  • ५,०००

  • संलग्नित महाविद्यालये

  • ११५

  • प्रवेशित एकूण विद्यार्थी

  • ६५,०००

विद्यार्थ्यांची ७५ टक्के हजेरी बंधनकारक

विद्यापीठाशी संलग्नित सर्व ११५ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक महाविद्यालयातील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. ते कॅमेरे कागदावर असू नयेत म्हणून प्रत्येक महाविद्यालयाकडून त्याचा आयपी ॲड्रेस सुद्धा विद्यापीठाने मागितला आहे. शैक्षणिक वर्षात तथा प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती अपेक्षित आहे. यासंदर्भात राज्यपाल भवनाकडून विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी दिली.

विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही म्हणून...

विद्यापीठातील संकुले व संलग्नित महाविद्यालयांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, त्यासाठी आधीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सत्राच्या शेवटी वेळापत्रक जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासाला अडचणी येतात. त्यामुळे कुलगुरू, प्र कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुढील आठवड्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT