Subedar Vijay Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

लडाखमध्ये सैन्याच्या गाडीला जबर अपघात; साताऱ्याच्या जवानाला वीरमरण

ऋषिकेश पवार

लडाखच्या तरतुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागलाय.

विसापूर : लडाख (Ladakh) प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे (Indian Army) वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विसापूर (ता. खटाव) येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Subedar Vijay Shinde) यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. या घटनेमुळं विसापूरसह खटाव तालुका (Khatav Taluka) शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

विजय सर्जेराव शिंदे हे सन १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये (Maratha Light Infantry) लष्करी सेवेत रुजू झाले होते. २४ वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचं संरक्षण केलं. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते, तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.

सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह-लडाख येथे होते. लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते. २६ जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि सोळा जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले. दरम्यान, विजय शिंदे यांचे पार्थिव रविवार दि. २९ मे रोजी विसापूर (ता. खटाव) येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT