tenth Exam paper 
महाराष्ट्र बातम्या

दहावीचा इंग्रजीचा पेपर एक तासात व्हायरल

संजय रानभरे

घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) : दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमाचा इंग्रजी विषयाचा पेपर परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासानंतर व्हाट्सपच्या दोन ग्रुपवर व्हायरल झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या पालकांत एकच खळबळ उडाली. माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयता 10वीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता येथील श्री. सोमेश्वर विद्यालय व शंकर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सुरू झाली. यात सोमेश्वर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नवीन अभ्यासक्रमानुसार इंग्रजी विषयाचे 225 परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर शंकर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नवीन अभ्यासक्रमानुसार इंग्रजी विषयाचा पेपर 198 तर जुन्या अभ्यासक्रमाचे (स्प्लेमन्ट्री) 8 परीक्षार्थी विद्यार्थी पैकी 1 परीक्षार्थी गैरहजर असल्याने 7 परीक्षार्थी विद्यार्थी हजर होते.

परंतु, परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासात म्हणजे 12 वाजून 5 मिनिटाला व्हाट्सपच्या एका ग्रुपवर तर 12 वाजून 20 मिनिटाला दुसऱ्या व्हाट्सपच्या ग्रुपवर जुन्या अभ्यासक्रमाचा इंग्रजी विषयाचा 'डी' सेटचा पेपर व्हायरल झाला. यामुळे परीक्षार्थीच्या पालकांनमध्ये एकच खळबळ उडाली.

परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी पर्यवेक्षकांचे व परीक्षार्थी विद्यार्थ्याचे मोबाइल ताब्यात घेऊन शील केले होते. त्याचे फोटो संबंधितांना आम्ही पाठवले आहेत. सदरील पेपर आमच्या केंद्रातून व्हायरल झाला नाही.
- व्ही एल गित्ते, परीक्षा केंद्रसंचालक

आम्ही इंग्रजी विषयाचे पेपर व उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रावर वेळेत व सुरक्षित पोहच केल्या.

- चंदन कुलकर्णी, परिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT