mahavitaran 1.jpg sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्राहकांनो, मोबाईल क्रमांक, ई-मेल नोंदणी करा! ‘महावितरण’चे वीजबिल तत्काळ मिळवा

मीटरचे फोटो रीडिंग घेतले जाते. त्यानंतर एक-दोन दिवसात वीजबिल तयार करून ते मोबाईल किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी केवळ मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची ‘महावितरण’कडे नोंदणी जरुरी आहे. वीजबिलाच्या तारखेपासून ७ कार्यालयीन दिवसात भरणा केल्यास एक टक्का सवलत मिळते.

तात्या लांडगे

सोलापूर : मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना ‘महावितरण’कडून दरमहा वीजबिल पाठविण्यात येते. पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत ‘महावितरण’कडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ८२ लाख ४८ हजार ३४७ ग्राहकांकडून मोबाईल क्रमांक आणि १४ लाख ९५ हजार ५६२ ग्राहकांकडून ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करून दोन्हीकडून दरमहा वीजबिल मिळविता येईल.

‘महावितरण’ने बिलींगची प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेतील एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ एक ते दोन दिवसात वीजबिल तयार करून ते मोबाईल किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी केवळ मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची ‘महावितरण’कडे नोंदणी जरुरी आहे.

वीजबिलाच्या तारखेपासून ७ कार्यालयीन दिवसात भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास एक टक्का सवलत मिळते. त्याची तारीख वीजबिलात नमूद असते. ‘एसएमएस’ किंवा ई-मेलद्वारे वीजबिल घेतल्यास ही सूट मिळविणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, रीडिंग घेतल्याची तारीख व युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस याची माहिती नोंदणीकृत मोबाईलवर येते. त्यामुळे सर्वांनी मोबाईल क्रमांक व ‘ई-मेल’ची नोंदणी करावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ५१ हजार ८७४ ग्राहकांनी मोबाईल क्रमांक आणि त्यातील ९२ हजार ३७६ ग्राहकांनी ई-मेलची नोंदणी केली आहे.

अशी करा ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी

  • - ‘महावितरण’च्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण ॲपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय

  • - वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते.

  • - याशिवाय २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT