4upsc_civil_service_exam_2020_696x464 - Copy.jpg
4upsc_civil_service_exam_2020_696x464 - Copy.jpg 
महाराष्ट्र

मोठी ब्रेकिंग! सोलापुरच्या ग्रामीण भागातील नवरत्न 'युपीएससी'त यशस्वी

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 4) ऑनलाइन जाहीर झाला. त्यात सोलापूर शहरातील एक, तर ग्रामीण भागातील आठ जणांनी यशाचा झेंडा रोवला. हे नवरत्न आता देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणार असून बहुतेक यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक शेती, मजुरी करतात. त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2019 मध्ये घेतली होती. तर फेब्रवारी 2020 मध्ये त्याच्या मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा निकाल आयोगाने मंगळवारी (ता. 4) ऑनलाइन जाहीर केला. देशभरातून 829 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात राज्यातील 56 विद्यार्थ्यांचा समावेश असून आता देशाच्या प्रशासकीय क्षेत्रात त्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. बार्शी शहरातील अजिंक्‍य विद्यासागर, अविनाश जाधवर, पंढरपूर शहरातून अभयसिंग देशमुख, तर ग्रामीण भागातून खर्डी येथील राहुल चव्हाण, अक्कलकोटचे योगेश कापसे, मंगळवेढ्यातील श्रीकांत खांडेकर, माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक (बोकडदरवाडी) येथील अश्‍विनी वाकडे, माळशिरसमधील सागर मिसाळ आणि सोलापुरातील शशांक माने या नऊजणांनी यश प्राप्त केले आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी राहुल चव्हाण (109), अभयसिंह देशमुख (151), अश्‍विनी वाकडे (200), सागर मिसाळ (204), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), अविनाश जाधवर (433), शशांक माने (743), अजिंक्‍य विद्याधर (789) यांनी युपीएससी परीक्षेत ही रॅंक मिळविली.


'युपीएससी'त महाराष्ट्राचा झेंडा (कंसात रॅंक) 
नेहा भोसले (15), मंदार पत्की (22), आशुतोष कुलकर्णी (44), प्रियंका किशोरे (61), योगेश पाटील (63), विशाल नरवडे (91), राहुल चव्हाण (109), कुलदीप जंगम (135), नेहा देसाई (137), जयंत मंकाळे (143), अभयसिंह देशमुख (151), अश्‍विनी वाकडे (200), सागर मिसाळ (204), महादेव गित्ते (210), कुणाल चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमीत महाजन (214), सारांश महाजन (224), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), गौरी पुजारी (275), प्रसाद शिंदे (287), आदित्य काकडे (382), निमीश पाटील (389), मयांक स्वामी (393), महेश गिते (399), कांतीलाल पाटील (418) स्वप्नील पवार (448), ऋषिकेश देसाई (481), नवनाथ माने (527), प्रफुल्ल देसाई (532), विजयसिंहगराव गिते (550), समीर खोडे (551), सुरेश शिंदे (574), अभिनव इंगवले (624), प्रियंका कांबळे (670), निखील खरे (687), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकाते (710), प्रज्ञा खंदारे (719), संकेत धनवे (727), शशांक माने (743), निखील कांबळे (744), राहूल राठोड (745), सुमीत रामटेके (748), निलेश गायकवाड (752), कुणाल सरोटे (765), अभय सोनकर (767), वैभव वाघमारे (771), सुनील शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दीक्षित (827). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT