Nagpur MLC Result esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur MLC Result : 'मविआ'चा उमेदवार फडणवीसांमुळे निवडून आला? विजयी अडबालेंची प्रतिक्रिया चर्चेत

संतोष कानडे

नागपूरः नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. भाजपच्या आणि संघाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय घोषित झाल्यानंतर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये देवेंद्र फणडवीसांच्या एका विधानामुळे आपला विजय झाल्याचं ते सांगत आहेत.

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार अडबाले म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणं शक्य नसल्याचं म्हटलं होते. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारी नाराज होते.

अडबाले पुढे म्हणाले, फडणवीस यांच्या विधानाचा परिणाम शिक्षकांवर झाला. तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी एकजुटीने काम केलं त्यामुळे हा विजय होऊ शकला.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. नागो गाणार हे भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. मागील दोन टर्म गाणार हे आमदार होते. ते हॅटट्रिक करतील, असं सांगितलं जात होतं.

परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. नागपूरमधली सहा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल ८६.२६ टक्के मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT