Harshwardhan Jadhav and Raosaheb Danve 
महाराष्ट्र बातम्या

भाजपला शिव्या नाही देणार तर काय? त्रिवेदींच्या वादग्रस्त विधानाने दानवेंचे जावई भडकले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यभरातून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. यातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधवांनी थेट चहा टपरीवरुनच भाजपला खडे बोल सुनावले आहे. (Sudhanshu Trivedi's controversial statement news in Marathi)

हर्षवर्धन जाधव म्हणाले की, काही महाभाग म्हणतात की, हर्षवर्धन जाधव १० वर्षे आमदार राहिले, तरी शिव्या देतात. अरे छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा माफी मागितली असती तर त्यांचा जीव वाचला असता. संभाजी महाराजांचे प्रेररणास्त्रोत असलेल्या शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितल्याचं भाजपवाले म्हणतात. मग शिव्या नाही घालणार तर ओव्या करणार का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सभ्यता मला शिकवता. भाजपची सभ्यता कुठ गेली? औरंगजेब कधी म्हणाला नाही शिवाजी महाराजांनी माफी मागितली नाही. भाजपवाले औरंगजेबाच्या पुढं गेले. ते म्हणतात माझ्यामुळे जलील निवडून आला. अरे जलील अशा गोष्टी करत नाही ते भाजपवाले करतात असही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

याआधी उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर कडाडून टीका केली होती. शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. मात्र आमच्या अस्मितेवर सातत्याने हल्ला होत आहे. यामागे कोणाचा मेंदू आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT