Sudhir Mungantiwar-CM Uddhav Thackeray google
महाराष्ट्र बातम्या

'मुख्यमंत्र्याविना लोकशाही', मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Assembly Session 2021) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) गैरहजर आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरूनच भाजप आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्याविना लोकशाही असा प्रकार आज पाहिला असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते. अमेरिकेत चालकाशिवाय गाडीचा शोध लागला आहे. पण, मुख्यमंत्र्याविना लोकशाही असा प्रकार आज पहिल्यांदा पाहिला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अधिवेशन मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. त्यावरून देखील सुधीर मुनगंटीवारांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चहापानावर आमच्या सारखा बहिष्कार टाकला, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेच्या जाहिरातीवार महापौरांचा फोटो हवा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला. आता राज्य सरकारच्या जाहिरातींवर शरद पवारांचा फोटो वापरावा, असा टोला देखील मुनगंटीवारांनी लगावला.

पंतप्रधान संसदेच्या अधिवेशनात का उपस्थित नाहीत? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी भाजपवर देखील टीका केली होती. त्यावरून मुनगंटीवारांनी पटोलेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकत नाहीत आणि नाना म्हणतात पंतप्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हणतात. काय तर्क लावतात माहिती नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT