Pankaja Munde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

BJP : पंकजा मुंडेंच्या विधानाने भाजपात नाराजी; मुनगंटीवारांकडून मात्र पाठराखण

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनीदेखील पंकजा मुंडेंची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pankaja Munde News : भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावरून चांगलेच वातावरण तापलेले असताना, भाजप नेते सुधीर मुंनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडेंच्या विधानानंतर भाजपच्या गोटात नाराजीचे वातावर आहे. त्यात आता मुंनगंटीवारांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे हा वाद लवकरच शांत होईल असे चित्र दिसू लागले आहे. जनमानसात माझी प्रतिमा चांगली असेल तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाहीत, असं पंकजा मुंडेंनी विधान केले होते.

पाठराखण करताना मुंनगंटीवार म्हणाले...

अनेकदा असे होते की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव पंकजा मुंडेंचा असावा असे मला वाटते. मात्र, यासंबंधीचे अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतले पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले. मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच असे सर्वप्रथम मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही अशी प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनीदेखील पंकजा मुंडेंची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचं नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं, हे मला सांगता येणार नाही. पण, मोदींना आव्हान दिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिलं नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT