minister sudhir mungantiwar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar : ''...आता रडायचं नाही चौकशीला सामोरं जायचं'' सुधीर मुनगंटीवारांनी भरला दम

संतोष कानडे

मुंबईः एकीकडे इंडिया आघाडीची बैठक आज होत आहे तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर आसूड ओढत आता चौकशी लागली तर रडायचं नाही, असा दम भरला आहे.

आज मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. आज आणि उद्या देशभरातील विरोधक मुंबईत असतील. इंडिया आघाडीच्या बैठकीत लोगोचं अनावरण आणि समन्वय समितीची घोषणा होणार आहे. काल महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी पत्रकार परिषद घेतली होती.

कालच्या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची उपस्थिती होती. काल शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणाबद्दल काही शंका असेल तर चौकशी कली पाहिजे. याच विधानाचा दाखला देत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना एक प्रकारे दमच भरला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विरोधक देशासाठी नव्हे तर नरडीवर बसण्यासाठी एकत्र येत आहेत. फक्त मोदींना हटवण्यसाठी विरोधकांची आघाडी झाली असून काल पवारांनी कोणाहीबद्दल शंका असेल त्यांची चौकशी केली पाहिजे, असं म्हटलं आहे. पूर्वी विरोधक म्हणायचे आम्ही राजकारणात आहोत म्हणून आमची चौकशी होतोय. त्यामुळे आता चौकशी झाली तर रडायचं नाही चौकशीला सामोरं जायचं आणि उत्तरं द्यायची, असं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, महेबुबा मुफ्ती, एमके स्टालिन हे मुंबईत दाखल झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत देशभरातील २८ पक्षांचे प्रमुख बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT