sudhir mungantiwar on LGBTQ e sakal
महाराष्ट्र बातम्या

LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार LGBTQ सुमहाच्या (LGBTQ Community) प्रतिनिधींना सदस्यत्व देण्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी LGBTQ समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विविध स्तरावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. बॉलीवूडमधून देखील मुनगंटीवारांवर टीका करण्यात आली. पण, मुनगंटीवार नेमकं काय बोलले होते? हेच आपण जाणून घेऊया.

''ज्या गोष्टी कधी सिद्ध करता येणार नाही, अशा गोष्टींचा या विधेयकामध्ये समावेश आहे. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का?'' असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला होता. तसेच अलैंगिक संबंधाची परिभाषा सरकारने सांगितली नाही. तर तुम्ही जनावरासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना अलैंगिक व्यक्ती समजणार का? असं वादग्रस्त वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं.

'या व्यक्तीला समलैंगिक संबंधाचे आकर्षण आहे' -

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलं. ''काही गोष्टी सिद्ध करता येत नाहीत. या बिलानुसार सद्स्य कोणाकोणाला करता येईल? हे तुम्ही सांगितलं. समलिंगी संबंध असणारी स्त्री, समलिंगी संबंध असणारा पुरुष, उभयलिंगी संबंध असणारा व्यक्ती, तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण करणारा पुरुष, आंतरलैंगिक, अलैंगिक पुरष यांना सदस्य करता येणार आहे. पण, अध्यक्ष महोदय हे सिद्ध कोण करणार आहे. तुम्ही करणार आहात का? व्हॉईस चान्सलर त्यांना सर्टीफिकेट देणार आहे? की या व्यक्तीला समलैंगिक संबंधाचे आकर्षण आहे. कोणीतरी लिहून देईल का की मला समलैंगिक संबंध ठेवण्याबाबत आकर्षण आहे. कोण सिद्ध करणार आहे?'' असे अनेक सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केले.

'अलैंगिक संबंध म्हणजे...'

''समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार आहात का? काहीतर गांभीर्य ठेवा. याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही का? यामध्ये उभयलिंगी आणि अलैंगिक संबंधाचा उल्लेख केला आहे. पण, त्याची परिभाषा अजून कोणी सांगितली नाही. अलैंगिक संबंध म्हणजे जनावरासोबत ठेवलेले संबंध. ते जनावर तुम्हाला तुम्ही अलैंगिक असण्याचं प्रमाणपत्र देणार आहे का?'' असं वादग्रस्त वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं.

'समलैंगिक आहे हे कसं ठरवाल?' -

''समलैंगिक संबंधांचे आकर्षण असणाऱ्यांचा विजय झालाच पाहिजे ही सरकारची हट्टी भूमिका आहे. राज्यावर तुमचं हक्क आहे, तेवढं आमचंही हक्क आहे. हा व्यक्ती याला समलैंगिक संबंधाचे आकर्षण आहे, हे कोण सिद्ध करणार आहे. हे बिल आपण राखून ठेवू. सिद्ध करण्यासाठी यंत्रणा आहे का? तुम्ही मान्यता कशी द्याल? यासंदर्भात खूप चर्चा करायला तयार आहोत. आपण पुढच्या अधिवेशनात हे बील मांडू'', असंही मुनगंटीवारांनी सूचवलं.

'उदय सामंत यांचं स्पष्टीकरण' -

सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे की, सर्वांना समान संधी मिळायला हवी. असा कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो असं नाही. अनेक राज्यांमध्ये कायदा झाला आहे. प्रत्येक घटकाला समान संधी मिळायला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा विपर्यास करून मोठं करण्यापेक्षा, तृतीय पंथियांना मोठ्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत. संपूर्ण भारतातील विद्वान लोकांशी चर्चा केल्यावरच हे बील आणले आहे, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT