Shekhar Gaikwad Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील गळीत हंगाम पूर्ण; विक्रमी साखर उत्पादन करणारा भारत हा जगात प्रथम

ब्राझील नंतर महाराष्ट्र हा जागतिक पातळीवरचा दुसरा सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा प्रदेश ठरला असून राज्यातील सगळा उस संपल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यातील यावर्षीचा उसाचा गाळप हंगाम आज पूर्ण झाला. राज्यातील सर्व साखर कारखाने आज बंद झाले आहेत. साखर कारखानदारी सुरु झाल्यापासून यावर्षीचा गाळप हंगाम हा सर्वात विक्रमी हंगाम ठरला असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील सर्व साखर कारखाने आज बंद झाले असून कुठलाच उस शिल्लक नाही असं साखर आयुक्त म्हणाले आहेत.

(Sugar Crushing Season Completed)

यावर्षी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते पण आता गळीत हंगाम संपला असून राज्यात कसलाच उस शिल्लक राहिला नाही अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान यावर्षीचा गाळप हंगाम हा सर्वात विक्रमी झाला असून आत्तापर्यंतच्या गाळप हंगामातील सर्वांत जास्त साखरेचे उत्पादन यावर्षी झाले आहे. या विक्रमी गाळप हंगामानतर ब्राझील नंतर महाराष्ट्र हा जागतिक पातळीवरचा दुसरा सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा प्रदेश ठरला आहे. तर भारत हा जगाच्या पातळीवर साखर उत्पादन करणारा प्रथम क्रमांकांचा देश ठरला आहे.

2021-22 या वर्षातूल गळीत हंगाम जवळपास 240 दिवस चालला आहे. आणि 15 जूनला गळीत हंगाम पूर्ण झाला. या हंगामात जवळपास 138 लाख टन साखर उत्पादन झाले असून 134 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन यावर्षीच्या गळीत हंगामातून झाले आहे. दरम्यान यावर्षी 100 लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. देशभरातील साखरेच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा हा 75 टक्के असणार आहे

दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीची 95 टक्के रक्कम जमा झाली आहे. 42 हजार कोटींची एफआरपीची रक्कम जमा झाली असून 4.72 टक्के रक्कम बाकी असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT