सोलापूर : ब्रिटिश काळापासून महाराष्ट्रात साखर कारखाने असून त्यावेळी माळशिरस (जि. सोलापूर), श्रीरामपूर (जि. नगर) येथे कारखान्यांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. १९४९ मध्ये नगर जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरु झाला. आता राज्यात एकूण २१० कारखाने असून महाराष्ट्र साखरेत स्वयंपूर्ण झाला आहे. दरवर्षी सरासरी ११० लाख टन साखर उत्पादित होते. देशाच्या एकूण साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी सरासरी २० किलो साखर लागते. त्यानुसार राज्यातील १२ कोटी जनतेसाठी दरवर्षी २४ लाख.टन साखरेची गरज भासते. पण, राज्यात ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने साखरेचे उत्पादनदेखील वाढले आहे. मागील वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते तर यंदा ११२ लाख टनांहून अधिक साखर उत्पादित होईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण ७० लाख टन साखरेत महाराष्ट्रातील ३४ ते ४० लाख टन साखर असते.
भारतीय उपखंडातील पाकिस्तान, बांगलादेश, इराण, नेपाळ या देशांमध्ये साखर निर्यात होते. केंद्र सरकारच्या मदतीने बहुतेक कारखान्यांनी वीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती सुरु केली आहे. १२ लाख टन साखर उत्पादित होईल, एवढा ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो, असेही साखर आयुक्तालयाने सांगितले.महाराष्ट्रात साखरेचे दर स्थिर राहतील, असाही आयुक्तालयाचा विश्वास आहे.
राज्यातील साखरेची स्थिती...
२१०
एकूण साखर कारखाने
११२ लाख
दरवर्षी साखर उत्पादन (टनांमध्ये)
४० लाख
राज्यातून साखर निर्यात
२४ लाख
दरवर्षी महाराष्ट्राची साखरेची गरज
महाराष्ट्र साखरेच्या बाबतीत ६० वर्षांपासून स्वयंपूर्ण असून सध्या राज्यात २१० साखर कारखाने असून त्यातील १९५ कारखान्यांचे गाळप सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३ कारखाने आहेत. दोन वर्षांत राज्यात २१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून त्यातील ७४ लाख टन साखर भारतीय उपखंडात निर्यात झाली आहे.
- डॉ. संजीवकुमार भोसले, सहसंचालक, साखर आयुक्तालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.