suhas kande aggressive in session Devendra Fadnavis Ajit Pawar gave understanding esakal
महाराष्ट्र बातम्या

अन् विधानभवनात फडणवीसांच्या मदतीला अजित पवार आले धावून

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाले.

धनश्री ओतारी

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र, कांदेंनी नाराजी दर्शवत आपला आक्रमकपणा कायम ठेवला. हे पाहत फडणवीसांच्या मदतीला अजित पवार धावून आले. त्यांनी आक्रमक कांदेंना शांत करण्याचा प्रयत्न केले. (suhas kande aggressive in session Devendra Fadnavis Ajit Pawar gave understanding )

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील अनेक वाद हे सर्वश्रुत आहेत. माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले. यावेळी ते आक्रमक झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. 'ही फाईल त्यावेळी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बंद केली आहे. यावर शासन योग्य ती कारवाई करेल. त्या संदर्भातील निर्णय सभागृहात करता येणार नाही. त्या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून आपल्या निर्णय करता येईल' असं फडणवीस म्हणाले.

मात्र, सुहास कांदेंनी आपली आक्रमक भूमिका कायच ठेवत उत्तर देण्याचा आग्रह केला. यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी करत पण कांदे यांनी मला हे उत्तर असेच पाहिजे म्हणू शकत नाहीत, अशी समज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT