Covid jumbo centre scam esakal
महाराष्ट्र बातम्या

Sujit Patkar arrest: राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना कोविड घोटाळा प्रकरणी अटक, ईडीची कारवाई

Sujit Patkar News: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ किशोर यांना ईडीकडून अटक

सकाळ डिजिटल टीम

Covid jumbo centre scam: संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

सुजित पाटकर यांच्याबरोबर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.

लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेस कंपनीकडून जंबो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. कोविड काळात जे वैद्यकीय साहित्य खेरदी करण्यात आलं होतं, त्यामध्ये अनेक गैरव्यवहार आढळून आले होते. या सर्व व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाला हवे होते.

असा आरोप केला जातोय की कोविड सेंटरमध्ये औषधे आणि इतर उपकरणांच्या किमती वाढवून सांगण्यात आल्या होत्या.कोविड सेंटर मध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला वाटत आहेत.

लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेसमध्ये सुजित पाटकर यांच्या बरोबरच आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक करण्यात आली आहे.

याआधी कोविड जंबो सेंटर घोटाळ्या संदर्भात ईडीने १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी ईडीने डेप्युटी कमीशनर रमाकांत बिराजदार यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ते सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटचे प्रमुख होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT