महाराष्ट्र

महत्त्वाकांक्षेतूनच ध्येय साध्य - सुमित खोत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘पोलिस आणि संरक्षण क्षेत्राची आवड लहानपणापासूनच होती. म्हणून सुरवातीला लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तेथे अपयश आले. त्यातून खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केले आणि पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या (पीएसआय) परीक्षेत यश मिळाले. परिपूर्ण अभ्यास आणि पोलिस होण्याची महत्त्वाकांक्षा यामुळेच ध्येय साध्य झाले,’’ अशी भावना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या मुख्य परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सुमित खोत यांनी व्यक्त केली.

सुमित हे मूळचे कोकणचे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्याच शाळेत सुमित यांचे वडील कल्लाप्पा खोत हे सध्या उपमुख्याध्यापक आहेत. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरमधील कृषी महाविद्यालयातून त्यांनी बी. एस्सी (ॲग्रिकल्चर) पदवी मिळविली. लहानपणापासून संरक्षण क्षेत्राची आवड असलेल्या सुमित यांनी बारावीपासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा देण्यास सुरवात केली. मात्र, त्यात वारंवार अपयश येत होते; परंतु तरीही हताश न होता त्यांनी पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथील कृषी तज्ज्ञ, कृषिमित्रांच्या मदतीने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून २०१७ मध्ये पीएसआय पदाची परीक्षा दिली.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास जून २०१५ पासून सुरवात केली. सुरवातीला बॅंकिंगसह अन्य क्षेत्रांतील परीक्षा देत होतो. मात्र लहानपणापासून पोलिस आणि संरक्षण क्षेत्राची आवड असल्याने २०१७ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास आणि त्यातून होत गेलेली परिपूर्णता, महत्त्वाचे ठरले. प्रत्येक टप्प्यात नवनवीन शिकत गेलो.
- सुमित खोत, एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या तीन विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT