Marriage  
महाराष्ट्र बातम्या

Marriage : 'उन्हसाळ्या'ने मोठं अवघड केलं! अवकाळीच्या तडाख्यामुळं ग्रामीण भागात ठरेना लग्नाच्या तारखा

सकाळ वृत्तसेवा

उमरा (नागपूर) : गावात एखादे मोठे सभागृह नसल्याने लग्न समारंभ करताना अनेक अडचणीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. अशातच बदलत्या वातावरणामुळे लग्न कोणत्या महिन्यात काढावे?, हा चिंतेचा विषय झाला आहे. एप्रिलमध्ये पितृपक्ष आणि चांदणी बुडी होती आणि ती निघून जाताच लग्नाच्या सनई वाजण्यात सुरू झाल्या. एप्रिल आणि मेमध्ये कडक ऊन असते. परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा एकच दिवशी अनुभवास मिळत आहे.

अकोट तालुक्यातील उमरा येथे मोठे सामाजिक सभागृह तसेच मंगल कार्यालय नसल्याने खुल्या आभाळाखाली मंडपच्या आधारे सामाजिक कार्य पूर्ण करावे लागतात. उमरा मंडळात गेल्या आठवड्यापासून बदलत्या वातावरणामुळे, अवकाळी पावसामुळे लग्न कार्यक्रम कसे पूर्ण करायचे हा प्रश्न पडला आहे.

अवकाळी पाऊस, सोसाट्याच्या वारा आणि गारांचा वर्षाव झाला, अशा वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल आणि मेमध्ये परीक्षा आटोपल्या असतात, शाळांनाही सुटी राहते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लग्नाचे जास्तीत-जास्त या दोन महिन्यात आयोजन होत असते.

उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस येत नसल्यामुळे लग्न जुळविले जातात. परंतु, निसर्गाचं ऋतू चक्र बिघडले आहे. गेल्या मार्च, एप्रिलमध्ये प्रत्येक आठवड्यात वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पाऊस पडत असल्याने लग्न मुहूर्त कोणत्या महिन्यात काढावे व कार्यक्रमाचे व्यवस्थापन कसे करावे?, असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

शेतकऱ्यांना खर्च न परवडणारा

निसर्गाच्या लहरीपामुळे पीक-पाण्याचा काही ताळमेळ नसल्याने लग्नकार्यचे बजेट अत्यंत तंतोतंत आहे. त्यामुळे तालुका ठिकाणी सभागृह भाड्याने घेऊन लग्न कार्य करणे हे शेतकरी वर्गाला कठीण आहे. तसेच गावात प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर लग्न मंडप थाटून लग्नकार्य सहज पूर्ण होतात. परंतु, अवकाळी पाऊस, जोरदार वारा यामुळे हे घरा जवळील लग्नकार्य पार पाडणे कठीण झाले आहे. त्यामुळे उमरा गावात सामाजिक सभागृह शासनाकडून बांधण्यात यावे, अशी ग्रामस्थांडून मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT