zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांना २ मेपासून उन्हाळा सुटी! १५ जूनपासून उघडणार शाळा; पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पास होण्याची अट; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १० जूनपूर्वी फेरपरीक्षा

राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी राहील, असे आदेश गुरुवारी (ता. १८) शिक्षण संचालकांनी काढले आहेत. तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होईल, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी राहील, असे आदेश गुरुवारी (ता. १८) शिक्षण संचालकांनी काढले आहेत. तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होईल, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुटी द्यायची याचा योग्य तो निर्णय घ्यावा, असेही शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भ वगळता उर्वरित विभागांमधील शाळा १५ जूनपासून सुरु होतील, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुटीनंतर तेथील राज्य मंडळांच्या सर्व शाळा ३० जूनपासून सुरु होतील. पण त्यावेळी रविवार येत असल्याने १ जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पाचवी व आठवीची फेर परीक्षा १५ जूनपूर्वी

इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यंदापासून शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे. त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. आता त्यांचा निकाल नेहमीप्रमाणे १ मे रोजी प्रसिद्ध होईल. त्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांना शाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा साधारणत: १० जूनपूर्वी घेतल्या जाणार आहेत. त्या परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागेल, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

‘आरटीई’च्या प्रवेश अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदत

आरटीई प्रवेशासाठी पालकांना आपल्या पाल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० मेपर्यंत आहे. मुदतीत अर्ज करणे आवश्यक असणार असून यंदा मुदतवाढ दिली जाणार नाही. प्रवेश अर्ज करताना आपल्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळांचाच पर्याय निवडणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज बाद होवू शकतो, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार का? महत्त्वाची अपडेट समोर

Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

FIFA World Cup 2026 : इंग्लंडच्या सामन्याचे एक तिकीट तीन लाख ३१ हजार रुपयांना

Latest Marathi News Live Update : वरंधा घाटात दरड कोसळली, महाड-पंढरपूर मार्ग ठप्प

Mirya Nagpur Highway : दरीच्या बाजूला उंच सिमेंटच्या भिंती, डोंगरकड्याला लोखंडी कवच; मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाट आता झाला 100 टक्के सुरक्षित?

SCROLL FOR NEXT