Thieves' attention on closed houses; Take care of summer holidays

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सावधान! उन्हाळा सुट्टीत फिरायला जाताय, बंद घरांवर चोरट्यांचे लक्ष; संशयित दिसल्यास करा ‘११२’वर कॉल; पोलिस म्हणाले, ‘या’ बाबी लक्षात ठेवा, वाचा...

जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची उद्यापासून (शनिवार) अंतिम सत्राची परीक्षा सुरू होत आहे. २२ एप्रिलनंतर शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. सुट्टीत अनेकजण मामाच्या गावाला किंवा फिरायला परगावी जातात. अशावेळी बंद घरांवर वॉच ठेवून असलेले चोरटे घरातील दागिने, रोकड लंपास करतात. त्यामुळे पोलिसांनी तर गस्त वाढविण्याचे नियोजन केलेच आहे, पण प्रत्येक नागरिकाने बंद घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची उद्यापासून (शनिवार) अंतिम सत्राची परीक्षा सुरू होत आहे. २२ एप्रिलनंतर शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. सुट्टीत अनेकजण मामाच्या गावाला किंवा फिरायला परगावी जातात. अशावेळी बंद घरांवर वॉच ठेवून असलेले चोरटे घरातील दागिने, रोकड लंपास करतात. त्यामुळे पोलिसांनी तर गस्त वाढविण्याचे नियोजन केलेच आहे, पण प्रत्येक नागरिकाने बंद घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. दागिने, रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी असून, शहर गुन्हे शाखेने उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रात्रगस्तीचे स्वतंत्र नियोजन (वेळापत्रक) तयार केले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक रात्रगस्त घालेल. रात्री १० नंतर शहरात येणाऱ्या रस्त्यांवर, शहरांतर्गत काही परिसरात नाकाबंदी देखील लावली जाणार आहे. नागरिकांनी उकाड्यामुळे घराबाहेर झोपताना घराला बाहेरून कुलूप लावावे, घराच्या छतावर झोपायला जाताना आतून घर नीट बंद केल्याची खात्री करावी. ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांनी त्यांची जनावरे सांभाळावीत. अडचणीच्या वेळी नागरिकांना ‘११२’वर कॉल करून पोलिसांची मदत घेता येईल. अवघ्या १० मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोचतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाळी सुट्टीत परगावी जाताना...

  • घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका, दागिने, रोकड बॅंकेत राहील सुरक्षित

  • घराला बसवा सेफ्टी डोअर, घरासमोर लावा काही हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा

  • परगावी जाताना शेजारच्यांना लक्ष ठेवायला आवर्जून सांगा, सुरक्षारक्षक ठेवा

रेकॉर्डवरील आरोपींवरही राहणार लक्ष

उन्हाळी सुट्टीत शहरातील अनेकजण परगावी फिरायला म्हणून जातात. या काळात घरफोडी, चोरीचे प्रमाण लक्षणीय असते. या पार्श्वभूमीवर आम्ही दिवसाबरोबरच रात्रगस्त देखील वाढविणार आहोत. रात्री प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी राहील. या काळात पाेलिसांच्या रेकॉर्डवरील प्रत्येक आरोपीवर विशेषत: चोरी, घरफोडीतील आरोपींवर देखील लक्ष राहणार आहे.

- डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

परगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू नको

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज रात्रगस्त, नाकाबंदी सुरू राहील. ‘लॉ इन्फोर्समेंट’ ॲपद्वारे पोलिसांच्या रात्रगस्तीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजते. नागरिकांनी शेतात, अंगणात बांधलेल्या जनावरांकडे लक्ष ठेवावे. परगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. उकाड्यामुळे घराबाहेर झोपताना घराला कुलूप लावावे.

- प्रीतम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री; साकारणार भरतची भूमिका

Latest Marathi News Live Update : लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT