Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

शरद पवारांना हे चौकशी आयोगानं पाठवलेलं हे तीसरं समन्स आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आयोगानं पाठवलेलं हे तिसरं समन्स आहे. यापूर्वी दोन वेळेस वैयक्तिक करणांमुळं पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते. (Summons to Sharad Pawar in Bhima Koregaon case present for interrogation)

येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईमध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीला शरद पवारांना हजर राहण्याचे निर्देश आयोगानं समन्सद्वारे दिले आहेत. याआधीच्या सुनावणीवेळी पवार हजर राहू शकले नव्हते. गेल्यावेळी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा सुनावणी होणार होती तेव्हा पवारांनी आयोगाकडे वेळ मागू घेत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. यासाठी आयोगानं त्यांना परवानगी दिली होती. हे प्रतिज्ञापत्र पवारांच्यावतीनं नुकतचं आयोगापुढे सादर करण्यात आलं आहे. त्यानुसार आयोगानं येत्या काळात होणाऱ्या सुनावणीसाठी पुन्हा एकदा शरद पवारांना समन्स बजावलं आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं दंगल झाली होती. या ठिकाणी असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांनी हल्ला केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीश जयंत पटेल यांच्या एकसदस्यीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT