Sunetra Pawar Legislative Assembly  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल; केंद्रात मंत्रिपद मिळणार का? राष्ट्रवादीची खेळी नेमकी काय?

Sunetra Pawar entered the Vidhan Bhavan to file the application: बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संतोष कानडे

NCP Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना केंद्रमध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं होतं. पराभवामुळे खचून गेलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि केंद्रीय योजनांचा थेट फायदा मतदारसंघासाठी व्हावा, यासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळेल, असं सांगितलं जातंय. मोदी सरकराच्या नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. मात्र आता सुनेत्रा पवारांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.

सुनेत्रा पवार विजयी होण्याइतपत संख्याबळ असल्यानेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. बारामतीला शरद पवार, सुप्रिया सुळे व आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तीन खासदार मिळतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा या निमित्ताने केंद्रीय निधीतून मोठा विकास होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT