dipak kesarkar 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी- दीपक केसरकर

कार्तिक पुजारी

मुंबई- सुनिल कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला वेगळे वळण लागलं आहे. सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी याप्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी सुनिल कावळे यांच्या कुटुंबियाला १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

दीपक केसरकर यावेळी म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये. शासनाकडून कावळे यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत दिली जाणार आहेत. तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल.

ओबीसी समाजाला असलेल्या सर्व सुविधा मराठा समाजाला दिल्या आहेत. सरकार याप्रकरणी संवेदशील आहे. कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नये. आम्ही कावळे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाची ऐकी त्यांना या दु:खातून बाहेर येण्यास मदत करेल. स्व:ताचा जीव देऊन काही मिळत नाही, असं केसरकर म्हणाले.

माझी कळकळीची विनंती आहे. सरकार संवेदनशील आहे. अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. पण, काही बाबी कायद्याच्या कसोटीवर उतराव्या लागतात. यात ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी मुख्यमंत्री स्वत: कामाला लागले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, कोणीही विपरित पाऊल उचलू नये, अशी विनंती असल्याचं ते म्हणाले.

सरकारने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. समिती स्थापन केली आहे. खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल याची मला खात्री आहे. दरम्यान, सुनिल कावळे (वय ४५) यांनी बुधवारी मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केलीये. त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

SCROLL FOR NEXT