sunil kedar संग्रहित छायाचित्र संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र बातम्या

उशीर झाला साहेब... जाहीर कार्यक्रमात मंत्र्याने मागितली अजित पवारांची माफी!

सकाळ डिजिटल टीम

सामूहिक स्वास्थ आणि पशुजन्य खाद्यपदार्थ सेंटरचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशु वैद्यकीय मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या समर्थ नेतृत्वामुळे विभागाने २०२० पर्यंत सामूहिक स्वास्थ आणि पशुजन्य खाद्यपदार्थ संशोधनामध्ये उल्लेखनीय प्रगती केल्याची माहिती मंत्री सुनिल केदार यांनी दिली. कार्यक्रमही मोठ्या दिमाखात पार पडला. पण चर्चा झाली ते मंत्री महोदयांची मागितलेल्या माफीची!

या कार्यक्रमाला पशूसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे मंत्री सुनिल केदार यांना पोहोचण्यात उशीर झाला. अजित पवार मात्र वेळेचे बांधील असतात. कायम वेळेत पोहोचण्यावर त्यांचा भर असतो. अनेकदा ते सकाळीच ८ वाजता कामकाज उकरण्यासाठी मंत्रालयातही असतात. या कार्यक्रमातही अजित पवार वेळेत उपस्थित झाले.

मात्र, ज्या खात्याचा कार्यक्रम होता, त्याचे मंत्रीच उशीरा आले. कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि स्टेजवर बोलताना मंत्री सुनिल केदार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माफी मागितली. पोहोचायला उशीर झाल्याचं कारण त्यांनी सांगितलं आणि सर्वांमध्ये हशा पिकला.

अन्न स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य विभागात अग्रगण्य संशोधन कार्याचा पाया घातला गेला. ज्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यामुळे सन २०२० मध्ये जागतिक बँक पुरस्कृत आयसीएआर नाहेप-कास्ट या प्रकल्पांतर्गत "प्राणीजन्य अन्नसुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्र" हि योजना सुरू झाली असून या योजनेअंतर्गत विभागात सर्व सुविधा युक्त अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे.

संबंधित प्रयोगशाळेत अद्ययावत उपकरणे असून या उपकरणांचा उपयोग प्राणीजन्य अन्नपदार्थाचे जसे की, मास, अंडी, दूध, मासे आणि त्यांच्यापासून बनवलेल्या पदार्थाच्या भौतिक, रासायनिक आणि सुक्ष्मजैविक चाचण्या करून त्यांच्या गुणवत्तेचे परिक्षण करण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT