Who is sunil raut who was in sajay raut home during ED investigation
Who is sunil raut who was in sajay raut home during ED investigation  esakal
महाराष्ट्र

"संजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाही, तो बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक"

दत्ता लवांडे

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने आज परत ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आता जरी संजय राऊतांना कोठडी सुनावली असली तरी ते सोमवारी जामीन होऊन बाहेर येतील असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्ना पाटकर आमच्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(Sunil Raut On Sanjay Raut's ED Custody)

"ज्या वेळी आम्ही अलिबागची जमीन घेतली होती त्यावेळी त्या जमिनीची किंमत होती ५० लाख रूपये आणि आता त्या जमिनीची किंमत एका कोटींच्या पुढे गेली होती, कारण त्या व्यवहाराला दहा वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे ईडी करत असलेले आरोप हे खोटे आहेत. यामध्ये कोणताच भ्रष्टाचार झाला नाही. संजय राऊत बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. तो कोणताच भ्रष्टाचार करू शकत नाही." असं सुनील राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वप्ना पाटकरने फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला होता तर ज्या फोनवर फोन आला होता तो फोन आम्ही जमा करायला सांगितला होता पण तो फोन जमा का करण्यात आला नाही असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, सुनावणीवेळी संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत कोर्टाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनीही धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. पण ते कोठडीत असताना ते धमक्या कसे देऊ शकतात असा प्रतिप्रश्न कोर्टाने त्यांना केला होता. त्यानंतर अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT