solapur sp atul kuljarni

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पोलिस अधीक्षक म्हणाले..! सोलापूर ग्रामीणमध्ये गणेशोत्सवापासून सर्वांसाठी ‘डीजे’ बंद हाच नियम; शिवजयंतीप्रमाणेच निघतील महामानवांच्या जयंती मिरवणुका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन प्रत्येकाला करावेच लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण गणेशोत्सवापासून ग्रामीण भागातील मिरवणुकांमध्ये ‘डीजे’बंदी केली आहे. त्यानंतर नवरात्र, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बकरी ईद साजरी झाली. त्यावेळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये देखील कोणाला ‘डीजे’साठी परवानगी दिलेली नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहराप्रमाणेच ग्रामीणमध्ये देखील पोलिसांनी गणेशोत्सवापासून ‘डीजे’ला परवानगी दिलेली नाही. त्यानंतर कोणत्याही मिरवणुकीवेळी ‘डीजे’ला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे तोच नियम कायम राहणार असून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढणाऱ्या मंडळांनी देखील ‘डीजे’ लावू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास ‘डीजे’ जप्त केला जाईल आणि ‘डीजे’वाल्यासह संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवानंतर नवरात्र महोत्सव, शिवजयंती, रमजान ईद झाली. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांनी कोणालाही ‘डीजे’ला परवानगी दिलेली नाही. या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाल्या. याच पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघतील, असा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला. सध्या ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेत आहेत. यावेळी पोलिसांकडून परवानगी मिळणार नसल्याने कोणीही ‘डीजे’साठी आगाऊ रक्कम देऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

पोलिसांच्या आवाहनाला पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हास्तरीय बैठक होईल, असेही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

‘डीजे’साठी कोणालाही परवानगी नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन प्रत्येकाला करावेच लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण गणेशोत्सवापासून ग्रामीण भागातील मिरवणुकांमध्ये ‘डीजे’बंदी केली आहे. त्यानंतर नवरात्र, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बकरी ईद साजरी झाली. त्यावेळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये देखील कोणाला ‘डीजे’साठी परवानगी दिलेली नाही. त्याच पद्धतीने सर्व मंडळांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी करावी. सर्वांनी कायद्याचे पालन करावे, गुन्हा दाखल होईल असे कृत्य कोणीही करू नये.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

मंडळांना मिरवणुकीसाठी मिळेल ‘पोलिस बॅण्ड’

सोलापूरच्या ग्रामीण भागातील प्रत्येक मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, जेणेकरून लहान मुले, मुली, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक देखील त्यात सहभागी होतील. मिरवणुका पाहायला ते येतील. मिरवणुकीत लेझिम, ढोल व झांज पथक, मर्दानी खेळ असावेत, आकर्षक देखावे करावेत. मंडळांनी मागणी केल्यावर त्यांना पोलिस बॅण्ड देखील दिले जाईल, असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT