Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uniform Civil Code: समान नागरी कायद्याला पाठिंबा पण...; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दाखवला आरसा

यासाठी ठाकरेंनी मनोहर पर्रिकरांच्या विधानाचा दाखला दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी विधी आयोगानं याची पडताळणी सुरु केली असून देशातील धार्मिक संघटनांकडून याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. या कायद्याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून केंद्र सरकारला आरसा देखील दाखवला आहे. (Support for Uniform Civil Code but Uddhav Thackeray showed mirror to Modi govt)

ठाकरे म्हणाले, आमचा समान नागरी कायद्याला पाठींबा आहे. पण जे हा कायदा आणणार आहेत त्यांनी हा विचार केलेला नाही की या कायद्यामुळं केवळ मुस्लिमांना अडचणी निर्माण होणार नाहीत तर हिंदुंना देखील यामुळं अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच इतर अनेक प्रश्न देखील यामुळं उपस्थित होतील. (Latest Marathi News)

हे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, समान नागरी कायदा लागू झाल्यास काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गोहत्या बंदी उठवावी लागेल. यासाठी त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा दाखला दिला. पर्रिकर यांनी स्वतः म्हटलं होतं की, जर गोव्यात गोमांसाची कमतरता भासली तर आम्ही ते आयात करु. (Marathi Tajya Batmya)

समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं सध्या हालचाली करणं यामागं राजकीय हेतू असल्याची टीका सुरु झाली आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर देशातील प्रत्येकासाठी मग तो कुठल्याही धर्माचा असो एकाच प्रकारचे कायदे लागू होतील. त्यांचे सर्व प्रकारचे धार्मिक कायदे मोडित निघतील.

यामध्ये लग्न, वारस नोंद, दत्तक आदींचा बाबत धार्मिक कायद्यांप्रमाणं काम करता येणार नाहीत. पण भारतात सर्वच धर्मियांची आपापल्या धार्मिक कायद्यांत रस असल्यानं या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणं अवघड असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT