sakal

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

‘कमवा व शिका’चा आधार; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १०० विद्यार्थ्यांसाठी योजना; वसतिगृहात ४०० मुलांची राहण्याची सोय, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ११ संकुले आहेत. त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून विद्यापीठाकडून दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ दिला जातो. दुसरीकडे, मुला-मुलींचे वसतिगृह देखील विद्यापीठात आहे. त्या ठिकाणी दरवर्षी ४०० मुले-मुले राहतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ११ संकुले आहेत. त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून विद्यापीठाकडून दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ दिला जातो. दुसरीकडे, मुला-मुलींचे वसतिगृह देखील विद्यापीठात आहे. त्या ठिकाणी दरवर्षी ४०० मुले-मुले राहतात.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ‘कमवा व शिका’ ही संकल्पना सर्वप्रथम राबविली. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणाकडेही हात पसरावे लागू नयेत, ते स्वावलंबी व्हावेत हा त्यामागील हेतू होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जातिधर्मांच्या मुला-मुलींसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. तसेच त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृहांची देखील स्थापना केली.

महाराजांच्या लोकोपयोगी या योजना पुढे राज्य सरकारने, विविध शैक्षणिक संस्थांनी स्वीकारल्या. सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मुलींचे २७० क्षमतेचे वसतिगृह आहे. मुलांसाठी १५० क्षमतेचे वसतिगृह स्वतंत्र आहे. त्यासाठी वार्षिक सात हजार रुपयांचे शुल्क आहे. विद्यार्थ्यांचे जेवण आणि राहण्याचा खर्च भागेल, अशी ‘कमवा व शिका’ योजना देखील विद्यापीठ राबविते. त्यासाठी दरवर्षी विद्यापीठाच्या बजेटमध्ये साधारणत: २० लाख रुपयांची तरतूद केली जाते.

वसतीगृहाची देखील सोय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संकुलांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना आहे. दरवर्षी होतकरू व गरजू १०० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ दिला जातो. तसेच विद्यापीठातील मुला-मुलींच्या वसतिगृहात ५०० विद्यार्थी असतात. आता ‘पीएम-उषा’ योजनेतून मिळालेल्या निधीतून नवीन वसतिगृह बांधली जाणार आहेत.

- डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

‘कमवा व शिका’तून विद्यार्थ्यांना मिळतात दरमहा ३६०० रुपये

‘कमवा व शिका’ योजनेच्या लाभासाठी दरवर्षी सरासरी ३०० विद्यार्थी अर्ज करतात, पण त्यातील १०० विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेली कागदपत्रे पाहून निवड केली जाते. योजनेत निवडलेला विद्यार्थी दररोज दोन तास काम करू शकतो. त्यातून त्याला दरमहा ३६०० रुपये मिळतात. या रकमेतून त्याचा वसतिगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च भागतो. आता प्रवेश प्रक्रिया सुरू असून, वसतिगृह व ‘कमवा व शिका’ योजनेसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT