Chief Justice Uday Lalit sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित हे सोलापुरातील ‘हरिभाई देवकरण’चे माजी विद्यार्थी

स्व. रंगनाथ यांचे नातू उदय लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. ते सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये-कोठारवाडी येथील लळित कुटुंबातील रंगनाथ उर्फ आण्णासाहेब लळित हे शंभर वर्षांपूर्वी वकिलीसाठी सोलापुरात आले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा वारसा जपला. स्व. रंगनाथ लळित यांचे चिरंजी उमेश हे १९७४ ते १९७६ या कालवधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिले. आता स्व. रंगनाथ यांचे नातू उदय लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. ते सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत.

स्वातंत्र्य लढ्यात १९३० मध्ये सोलापुरात मार्शल लॉ चळवळीत ब्रिटिश सैन्यांनी अनेकांवर अमानुष अत्याचार केला होता. त्यावेळी अन्यायग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून चार दावे न्यायालयात दाखल झाले. त्यात स्व. रंगनाथ लळित हे ब्रिटिशांविरूध्द अन्यायग्रस्तांच्या बाजूने लढले. ते निष्णात वकील होते. त्यांची मुले उमेश, जयंत, सुभाष आणि आनंद यांनीही वकिलीचा वारसा पुढे चालविला. उमेश हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. त्यांचे चिरंजीव उदय व सुबोध हेही वकिलीच करू लागले. सरन्यायाधीश उदय लळित यांचे शालेय शिक्षण सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही अनेक वर्षे काम पाहिले. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी चालविले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हरिभाई देवकरण प्रशालेच्या निवृत्त शिक्षिका पुष्पा आगरकर, वर्गमित्र डॉ. अनिकेत देशपांडे, सागर भोमाज, ‘सेबी’चे मुख्य सरव्यवस्थापक सुरेश गुप्ता, सुरेश बांदल, ॲड. भगवान वैद्य, ॲड. पांडुरंग देशमुख हे आवर्जुन उपस्थित होते. उदय लळित सरन्यायाधीश झाल्याने हरिभाई देवकरण प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे.

भुईकोट किल्ल्याजवळ त्यांचे वास्तव्य

सोलापुरातील भुईकोट किल्ल्याजवळील लकी चौक परिसरात लळित कुटुंबाचे वास्तव्य आहे. वकिली क्षेत्रासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयात रंगनाथ उर्फ आण्णासाहेब लळित वृत्तपत्र विभाग असून वकिलांसाठी आनंदराव लळित यांनी सेवासदन शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व संचालक मंडळातही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT