Uddhav Thackeray and Bacchu Kadu  
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: ऑपरेशनमध्ये चुका झाल्या, मात्र पेशंट वाचला ते महत्त्वाचं; निकालानंतर कडूंची प्रतिक्रिया

संतोष कानडे

मुंबईः आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय झाला. प्रतोदांची निवड, राज्यापालांची भू्मिका यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने पेच निर्माण झाल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळेच सध्या शिंदे सरकारला कसलाही धोका नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले बच्चू कडू

न्यायालयाच्या निर्णया नंतर सरकारला दिलासा मिळाला आहे. कोणाचंही निलंबन झालेलं नाही. निलंबनाचा निर्णय अध्यक्षांना द्यावा लागेल. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे निर्णयायचा वेगळा निर्णय लागणार नाही. उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंकडे आमदारांची खासदारांची संख्या जास्त आहे. जो निर्णय झाला आहे तो संख्येच्या बळावर झाला आहे. त्यामुळे सरकार अधिक मजबुतीने काम करेल. राज्यपालांचं काही चुकलं असेल मात्र ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं आहे.

राजीनाम्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आणता आले असते, असं सुप्रीम कोर्टाने आजचा निर्णय देताना म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं की, कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला हे चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? तर मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाही. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT