Arun Gawli to Stay Behind Bars eSakal
महाराष्ट्र बातम्या

Arun Gawli Parole: अरुण गवळीला सुट्टी नाहीच! सुप्रीम कोर्टाने दिला दणका, वयाचे कारण देत...

Supreme Court denies parole to gangster Arun Gawli: अरुण गवळीकडून वयाचे कारण देत सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती.

रोहित कणसे

नवी दिल्ली - जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळी याला सुप्रीम कोर्टाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. गवळीकडून वयाचे कारण देत सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती. अरुण गवळी याला २०१२ साली मकोका अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा सुनावली होती. (Arun Gawli News)

नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. दरम्यान अरुण गवळी याने चौदा वर्षे शिक्षा भोगली असून ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणी गवळीकडून करण्यात आली होती.

२००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने मांडले होते.

त्यामुळे चार आठवड्यात अरुण गवळीच्या सुटकेचा निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला पॅरोलवर सुट्टी मंजुर करण्यात आली होती. याविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी अरुण गवळी याला दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

१४ वर्षांची शिक्षा पूर्ण झालेल्या आरोपीला रेमिषणवर सोडलं जात, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. आज कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नाही, कोर्ट नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण ऐकणार आहे. दरम्यान अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.

अरुण गवळीची राजकीय वाटचाल

कुख्यात डॉन अरुण गवळी हा २००४ च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी त्याला ९२ हजार २१० मते मिळाली. तर चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून २००४ रोजी अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला ३१ हजार ९६४ मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला.

अरुण गवळीची मुलगी गीता गवळी यांनी २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे २० हजार ८९५ आणि दहा हजार ४९३ अशी मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT