Supreme Court on Anil Deshmukh Case, SC on Anil Deshmukh Case
Supreme Court on Anil Deshmukh Case, SC on Anil Deshmukh Case sakal
महाराष्ट्र

Anil Deshmukh Case : ठाकरे सरकारला दणका, SC नं SIT तपासाची याचिका फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांच्या प्रकरणात राज्य सरकारला दणका दिला आहे. विेशेष तपास पथकामार्फत न्यायालयाच्या देखरेखीखाली देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने याचिकेद्वारे केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Anil Deshmukh Case) उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. (SC on Anil Deshmukh Case)

न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या वकिलांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या सीबीआय तपासावर आक्षेप घेतला. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक होते. तसेच ते पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टींग देखरेख ठेवणाऱ्या महाराष्ट्र पोलिस आस्थापना मंडळाचा एक भाग होते, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला.

सीबीआयने २० एप्रिल २०२१ ला अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी निर्देश दिले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमधील घोटाळ्याबाबत काही गुन्हा दाखल झाले होते. राज्य सरकारने त्याला आव्हान देण्याचे प्रयत्न केले. पण, ते निष्फळ ठरले. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सुनावणी सुरू असताना मध्यंतरी सीबीआयच्या तपासाला स्थगिती दिली होती. पण, शेवटी न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. एसआयटीला तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली. पण, उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT