shiv sena Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray: तुमच्या सुप्रीम कोर्टात बैठका झाल्यात का...त्या दाव्यावरुन सेनेच्या बड्या नेत्याचा सवाल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र, कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला असून निर्णय कधी देण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (supreme court hearing Shiv Sena eknath shinde vs uddhav thackeray maharashtra politics )

सुनावणीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, सुनावणी दोन्ही बाजूने झाली. न्यायालयात आमच्याकडून अनिल देसाई आणि अनिल परब उपस्थित आहेत. न्यायालयात काय झालं हे दोघांनीही स्पष्ट सांगितलं आहे. सुनावणीकडं उद्धव ठाकरेंच बारीक लक्ष, प्रत्येक घडामोडी ते पाहत आहेत.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद पाहिल्यावर प्रत्येकजण आपली भूमिका आपापल्या दृष्टीकोणातून मांडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि बंडखोर गट वारंवार सांगतायत की निकाल आमच्याच बाजूने आहे. चिन्ह आम्हालाच मिळेल. आमचाच बाप खरा. असं बोलतायत.

फडणवीस यांनी एका कार्यक्रमात निकाल आमच्या बाजून लागणार असल्याचे सांगितले. एवढा आत्मविश्वास त्यांना येतो कोठुन? नारायण राणे यांच्यावर कारवाई व्हायला हवी कारण, 'त्यांनी लिहून घ्या ब्रेकिंग न्यूज चिन्ह हे फुटीर गटाला मिळेल" हे तुम्ही खात्रीने कसं सांगू शकता? असा सवाल उपस्थित राऊतांनी केला. तर तुमच्या रात्री बैठका झाल्या का सुप्रीम कोर्टात? ते काय कणकवीला कॉर्नर मिटींग आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले.

कोर्टात आम्ही अत्यंत ठामपणे आमची बाजू मांडली आहे. आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. अजूनही या देशातला न्याच मेलेला नाही. आणि शिवसेना कुणाची आहे हे पाहायचं असेल तर जनतेत जाऊन पाहा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. असं ठामपणे राऊत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT