Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर 6 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या दृष्टीकोनातून मराठा समाजासाठी आज महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज (6 डिसेंबर रोजी) पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 6 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाच्या पाच पाचसदस्यीय घटनापीठाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण अवैध ठरवलं होतं. त्याचबरोबर मराठा समाज मागासलेला असून त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशी शिफारस करणारा न्या. गायकवाड समितीचा अहवाल कोर्टाने फेटाळून लावला होता.

मराठा समाजाला आरक्षण देताना इंद्रा साहनीप्रकरणी घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे आरक्षण देता येणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. संसदेने १०२ वी घटनादुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असाही निष्कर्ष कोर्टाने नोंदविला होता. (recent supreme court decisions on maratha reservation)

त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.(curative petition on Maratha reservation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT