Bullock cart Race Permission esakal
महाराष्ट्र बातम्या

SC on Bullock Cart Races : बैलगाडा शर्यतीचे भवितव्य उद्या ठरणार! सर्वोच्च न्यायालय देणार महत्वपूर्ण निकाल

रोहित कणसे

राज्यात बैलगाडा शर्यतींचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान राज्यातील बैलगाडा शर्यतींचे भवितव्य उद्या, १८ मे रोजी ठरणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय तामिळनाडूतील जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रतील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आपला निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

बैलगाडा शर्यती आणि जल्लीकट्टू यांच्या परवानगीबाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल काय असेल याकडे या दोन राज्यांचे लक्ष असणार आहे. या प्रकरणावर घटनापीठाने सुनावणी करून निकाल राखीव ठेवला होता. तामिळनाडूतील जालिकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत नेमकं काय होणार याबद्दल उत्सुकता आहे.

प्रकरण काय आहे?

राज्यात बैलगाडा शर्यतीवर राज्यात बंदी घालण्यात आली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर या शर्यतींबद्दल अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आले होती. याप्रकरणातील सुनावणी घटनापीठापुढे पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. मात्र उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल काय असेल? कोर्ट परवानगी देणार की बंदी घालणार याबद्दल उत्सुकता असून बैलगाडा शर्यत चाहत्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT