Kapil sibal 
महाराष्ट्र बातम्या

Kapil sibal: 'ठाकरे सरकार पाडण्यासाठी...', कपिल सिब्बल यांनी मांडला मोठा मुद्दा

शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेऊन बंड केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेऊन बंड केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार होत आहे. आज सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मोठा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या या युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात सिब्बल यांना खोकेप्रकरणावर तर कोर्टाचं लक्ष वेधायचं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. (supreme court Kapil sibal )

कोर्टाची सुनावणी सुरू होताच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला.

नबाम रेबिया प्रकरणाचे संदर्भ देत अविश्वास प्रस्ताव असताना विधानसभेचे उपाध्यक्ष आमदारांना नोटीस पाठवूच कसे शकतात? असा सवाल करतानाच विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांचा पाच वर्षाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकारच नसल्याचं महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी कोर्टाला स्पष्ट केलं.

त्यांतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आलं, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी केला. सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांची चर्चा सुरू झाली.

मात्र, कोर्टाबाहेर सिब्बल यांच्या युक्तिवाद्यानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. खोकेप्रकरणावर तर कोर्टाचं लक्ष वेधायचं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT