Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

सकाळ डिजिटल टीम

सुप्रीम कोर्टात उत्तम निर्णय होईल, मुनगंटीवारांचा विश्वास

शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी केली, वाद टाळण्यासाठी कदाचित ही मागणी केली असेल, एक उत्तम निर्णय सुप्रीम कोर्टात होईल असा विश्वास मला वाटतो,

देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना कोणतीही प्रतिक्रिया देणं अयोग्य असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून काय युक्तिवाद करण्यात आले?

आम्ही २७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं. याच दिवशी निवडणूक आयोगाबद्दलचे सर्वांचे युक्तिवादही ऐकून घेतले जातील, तसंच त्यावर सविस्तर सुनावणी होईल. त्यावर उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी हे चुकीचं असल्याचा दावा केला आहे. ज्यांना विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळालं की, सगळा कारभार व्यर्थ ठरेल, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. तर आमदार असो, वा नसो, पक्षावर दावा करुच शकतो, असं शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्याकडून सांगण्यात आलं.

तारीख पे तारीख

आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत घटनापीठात नाहीत

सध्याचे सरन्यायाधीश उदय लळीत या घटनापीठात नाहीत, कारण त्यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरपर्यंतच आहे. त्यादिवशी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते या घटनापीठात नसावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाकडून याचिका दाखल

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका शिंदे गटाकडून दाखल कऱण्यात आली आहे. निवडणुका लढवण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी, नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर पार पडेल. निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि शिवसेनेच्या नावासाठी निर्णय घेऊ शकेल का हे या सुनावणीमध्ये ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT