Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar esakal
महाराष्ट्र

Supreme Court : डॉ. दाभोलकर हत्येचा तपास बंद करण्यासाठी याचिका; SCची सीबीआयला नोटीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास बंद करण्याबाबत दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस पाठवली आहे. याचिकेबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश नोटिसीद्वारे न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसुंद्दिन अमनउल्लाह यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी याबाबतची याचिका दाखल केली आहे. हत्येचा तपास पूर्ण झाला असून तो बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

ॲड. आनंद ग्रोव्हर आणि ॲड. किशन कुमार यांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. डॉ दाभोलकर खून खटल्यात संशयित आरोपींच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात खटला सुरू आहे. दाखल याचिका पुणे येथील विशेष न्यायालयातील खटल्याच्या देखरेखीसाठी नसून हत्येचा सूत्रधार फरार असल्याबाबत आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

डॉ. दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून हे एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे याचिकेमार्फत मांडण्यात आले आहेत. या हत्यांमागील सूत्रधार फरार असेपर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जिवाला असलेला धोका कायम आहे, असे म्हणणे याचिकाकर्त्यांकडून मांडण्यात आले. याचिकेची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला त्यांचा तपास बंद करण्याच्या भूमिकेची पार्श्‍वभूमी स्पष्ट करण्याबाबत नोटीस बजावली आहे, अशी माहिती ॲड. नेवगी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT