Supreme Court on Bharat Gogawale appointment as shiv sena whip Supreme Court Final Decision on Shivsena Case  
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case : CM शिंदेंना ‘सुप्रीम’ दणका! गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर; CJI चंद्रचूड म्हणाले, कुठलाही गट…

रोहित कणसे

सत्तासंघर्ष सुनावणीचा निकालाचं वाचन सुरू होताच उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. राजकीय पक्षांनीच नेमलेल्या व्हीपलाच अध्यक्षांनी मान्याता दिली पाहीजे असे मत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

यासोबतच शिंदे गटाला पहिला झटका बसला आहे. न्यायालयानं व्हिपचा अधिकार सुनील प्रभू यांनी जो बजावला तो योग्य होता असे सांगत गोगावले यांची नियुक्ती आणि त्यांचा अधिकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणात व्हिप कुणाचा, त्याचा अधिकार कुणाचा हे सगळ्यात महत्वाचे होते. यामध्ये अधिकृत राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हीपलाच मान्यता अध्यक्षांनी दिली पाहीजे असे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे.

भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर, मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करु शकत नाही. अपात्रतेपासून बचाव करण्यासाठी आम्हीच खरी शिवसेना असे म्हणणे चुकीचे आहे. तो दावा कोर्टानं बाद ठरवला आहे.

दहाव्या सुचीनुसार पक्षांर्गत फुटीला कोणताही अधिकार नाही, त्याला अर्थ नाही. कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. या निकालामध्ये तिसरे महत्वाचे आहे ते राज्यपालांबाबत आहे. बहुमत चाचणी बोलावण्यासाठी आलेली बैठक वैध नाही. कारवाई करण्यासाठी केलेला युक्तिवाद पळपुटा असल्याचे म्हणत राज्यपालांना सुप्रिम कोर्टानं झटका दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT