Maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : राज्य शासनाला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

संतोष कानडे

नवी दिल्लीः मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदरील याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून हा सरकारला धक्का समजला जात आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचाः What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही- पाटील

दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. पुन्हा जैसे-थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजाने चार मुख्यमंत्री बघितले. मात्र कुठल्याच सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे ही वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली आहे.

राज्य शासनातर्फे जून २०२१ मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

याचिका दाखल केली त्यावेळी संभाजीराजे म्हणाले होते की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करून जबाबदारी ढकलतं आहे. परंतू आता मराठा समाजाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आम्हाला कोर्टाच्या निकालावर मार्ग काय काढणार ते सांगा अशी स्पष्ट ताकीद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

Pune Burglary: सिंहगड रस्त्यावर बंद घरफोडी; २४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

SCROLL FOR NEXT