महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

सकाळ डिजिटल टीम

सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कंबर कसली आहे. नुकताच त्यांनी राज्यातील काही भागांमध्ये दौरे करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तेत येण्याबाबत अतिशय सूचक विधान केले आहे. शरद पवारांचा एक महाराष्ट्राचा दौरा झाली की, ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्राने हे अगदी जवळून अनुभवलं आहे की, ज्यावेळी पवार विरोधकांच्या बाकावर बसतात त्यानंतर ते दौऱ्यावर निघतात आणि याच ठिकाणी सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होतो. कारण पवारांचा दौरा झाला की, ते पुन्हा सत्तेत येतात.

शरद पवारांनी राजकारण आणि समाजकारणात 55 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक चढ उतार पाहिले आहेत. जेवढे चढ आले, तेवढेच उतारही त्यांच्या अनुभवाला आल्याचं त्या म्हणाल्या. विरोधात असताना शरद पवारांना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नुकताच पवारांनी राज्यव्यापी दौरा केला आहे. त्यात सुळे यांनी ज्याप्रमाणे पवार दौरा करतात आणि त्यानंतर ते पुन्हा सत्तेत येतात असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होऊन सत्तांतर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT