Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : सध्याच्या राजकारणावर काय वाटतं? सुप्रिया सुळेंचं कौतुक करताना आजीबाईंनी विचारला अवघड प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि लोकसभा अध्यक्षांकडील याचिकेवर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अचानक एका आजीबाईंनी सुळेंना सध्याच्या राजकारणाबद्दल अवघड प्रश्न विचारला, त्याला सुप्रिया सुळेंनीही खुमासदार उत्तर दिलं.

एका आजींनी सुप्रिया सुळे यांना विचारलं की, सध्याच्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं? त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं- राजकारण गलिच्छ झालं आहे. पुढे आजी म्हणाल्या, कोणी केलं? जनतेने तर केलं नाही ना? सुळे म्हणाल्या, तुम्हला माहिती आहे का? त्यावर आजीबाई बोलल्या, आम्ही नाव नाही घेऊ शकत? पण तुम्ही चांगलं काम करता.. तुमचा अभिमान आहे. मी रोज पाहते.

आजींच्या कौतुकानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी १५ वर्षे राजकारणात आहे. माझ्यावर कुठला आरोप झाला आहे का? असं म्हणत हात मिळवत आशीर्वाद द्या, असं बोलल्या.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया म्हणाल्या की, २०१४ ते २०१९ त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण नंतर त्यांनी १०५ आमदार निवडून आणले. आता दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे दिल्लीच्या अदृश्य शक्तीने फडणवीस यांना कमकुवत केलं आहे.

तटकरेंबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की, सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला पूर्ण सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून निर्णय घेतला, म्हणून आम्ही त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या महिला धोरणावेळी आम्ही सगळ्यांनी एकत्रित मतदान केलं, त्यावेळीही सुनील तटकरे हजर नव्हते, आम्ही नैतिकतेवर मागणी केली असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT