supriya sule sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : पक्षात तुम्ही कोणाला रिपोर्टिंग करणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. यादरम्यान अजित पवारांवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे. तसेच पक्षात कोण कोणाला रिपोर्ट करेल याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याप्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे पक्षात कोण-कुठली जबाबदारी सांभाळेळ या विषयी बोलताना म्हणाल्या की, मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना अर्थातच रिपोर्ट करणार. तर राज्यात छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, प्रभारी म्हणजे ही काही दडपशाही नाहीये, हा लोकशाहीचा पक्ष आहे. आम्ही इथं सेवा करण्यासाठी आलो आहे त्यामुळे रिपोर्टचा प्रश्न येतो कुठे? पण जबाबदारी प्रत्येकाची असेल असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मिळून आम्ही काम करू. सर्व वरिष्ठ मार्गदर्शन मला असेल. दादा (अजित पवार) हा महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेता आहे. विरोधीपक्षनेत्याचं पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने असते असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT