supriya sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

राजकारण करायचं तर समोरून करा, कुटुंबावर हल्ले कशाला : सुप्रिया सुळे

ईडी आणि सीबीआय या संस्थांचा राजकीय वापर होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजकारण करायचंच आहे, तर हल्ले समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी सरकारवर टीक केली आहे. CVC विधेयक आणि दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट विधेयकावर बोलताना सुळे यांनी वरील टीका केली आहे. ईडी आणि सीबीआयचे छापे केवळ विरोधकांवरच होत असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय (ED & CBI Raid on Politician) या संस्थांचा राजकीय वापर होत असल्याचे त्या म्हणल्या.

दरम्यान, यापूर्वीचे छापे हे राजकीय नेत्यांवर करण्या येत होते, मात्र, आता ही कारावाई नेत्यांच्या बायका मुलांवरदेखील केली जात आहे. (CBI Raid On Politician Family) त्यामुळे हल्ले करायचेच असतील तर, समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला असा प्रश्नदेखील यावेळी त्यांनी सरकारला विचारला.

भाजप खासदार भाषणात बोलतात की, आता आम्ही भाजपमध्ये आलो आहोत, त्यामुळे आमच्यावर आता छापेमारी होत नाही असे सांगताना त्या म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्या घरी सहावेळा छापेमारी झाली, त्यात हाती काहीच लागले नाही. त्यामुळे पुन्हा सातव्यांदा छापेमारी करावी लागली.

सरकार 25 वर्ष काम करणार

राज्यात आलेले महाविकास आघडी सरकार (Mahavikas Aghadi Government In Maharashtra) पडणार पडणार असे अनेकदा बोलण्यात आले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आणि 25 वर्ष काम करणार असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT