Supriya Sule e sakal
महाराष्ट्र बातम्या

"आम्ही ६० वर्षांत जे केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवताय"; मोदींना टोला

राज्यातल्या भाजपा नेत्यांनी १०५ आमदार सांभाळावेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच गेलेत, असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. महागाई आणि महिलांच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींवरून पंतप्रधान मोदींना सुनावलं आहे. परभरणीतल्या बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. (Supriya Sule slams PM Narendra Modi over inflation)

महागाईवरून मोदींवर टीका करताना सुप्रिया सुळे(NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, "गरीबांना मोफत सिलेंडर देतो सांगून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिलं, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलंय. यांचा फोटो पेट्रोल पंपावर असतो. पण यांना फक्त जाहिरातबाजी करता येते. मोदींना (PM Narendra Modi) मला स्वर्गीय सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यायची आहे. त्या जेव्हा विरोधी पक्षात होत्या, तेव्हा सिलेंडर ४०० रुपये होता. आता हजारांच्या वर सिलेंडरची किंमत गेलीये. याचं भान त्यांना आहे का?"

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी एवढ्या संस्था विकतायत आणि आम्हाला विचारतायत की ६० वर्षांत आम्ही काय केलं. आम्ही जे ६० वर्षांत केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवत आहात. राज्यातले भाजपा (Maharashtra BJP) नेते उठसूट आमच्यावर टीका करतायत, त्यांना दुसरं कामच राहिलेलं नाही. त्यांनी एक लक्षात ठेवावं, त्यांच्याकडे जे १०५ आमदार आहेत, ते राष्ट्रवादीतूनच गेलेले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT