supriya sule ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: संजय राऊतांच्या 'त्या' टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अजितदादांवर केलेल्या टीकेवर मला हसू...'

अजितदादांसोबत राजकीय मतभेद आहेत, मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी रविवारच्या रोखठोक सदरातून अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. रोखठोक सदरातून शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली असं संजय राऊत यांनी लिहलं आहे.

तर पुढे या संस्थांमधून अजित पवारांनी बाहेर पडावं, असंही संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहलं होतं. राऊत यांच्या त्या वक्तव्यासंबधीचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अशा पध्दतीची टीका म्हणजे बाळबोध असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

'साम टीव्ही'शी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आमचे राजकीय मतभेद आहे. परंतु आमच्यामध्ये मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेवर मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांचं काय करायचं ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नाती तर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती निर्माण झाली आहेत. तर माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, आमचा मोठा गोतावळा आहे. पवार साहेबांचे अनेक नातेवाईक आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातील या संस्था आहेत. त्या संस्थांवर शरद पवार यांनी अजितदादांना घेतलं आहे. त्यामुळे आता त्या संस्थांचं पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली असावं असं संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT