Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: "मी गेटक्रश केलं..."; अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Sandip Kapde

Supriya Sule: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळेल. कर्तज येथील शिबिरात अजित पवार यांनी हे सुतोवाच केले आहेत. बारामती, सातारा, शिरुर, रायगड लोकसभा लढवणार, असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

बारामतीत अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळे यांनी आव्हान दिले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर प्रेम करणारी मी नागरिक आहे. एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे. हा त्यांना अधिकार आहे. बारामतीत लढण्याचे देखील अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करते. मात्र जनता ठरवेल कोण जिंकेल ते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार भाजपसोबत जाण्याची जी देवगिरीवर बैठक झाली. त्या बैठकीत सुप्रिया सुळे होत्या. त्यांच्या साक्षीने चर्चा झाली आणि त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली गेली होती. २ जुलै रोजी बैठक झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला.

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी बैठकीला नव्हते. मी गेटक्रश केलं होतं. मी गेले होते. माझ्या भावाचं घर आहे मी जाऊ शकते. मात्र मी चर्चेत नव्हते. मी विचारलं पण मला कुणीच काही सांगितलं नाही. बेसिक चर्चा झाली होती. तुम्ही प्रस्ताव द्या, मी बाबांशी बोलते, असे मी त्यांना सांगितले होते. मात्र भाजपसोबत जाण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती.

अजित पवार म्हणाले मुलांपेक्षा मुली वशांचा दिवा असतात, असं काही जणांनाच वाटतं. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो प्रत्येकाचाच वयैक्तिक अधिकार आहे कुणाला काय वाठतं. सावित्रीबाई फुले यांनी मला शिक्षणाचा अधिकार दिला. मोदी साहेंबानी महिला आरक्षणाचे बिल आणले. शरद पवार आणि राजीव गांधी यांनी ५० टक्के आरक्षण दिले, असे सुळे म्हणाल्या.

२ जुलैला जी ७ दिवसांबद्दल चर्चा नव्हीती. तर १७ तारखेला वाय बी चव्हाण सेंटरला बैठक झाली त्याला आम्हाला का बोलवण्यात आलं, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अजित पवार जे बोलत आहेत त्यांना तो अधिकार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाहेर बोलायच्या नसतात. माझ्या आईचे माझ्यावर संस्कार आहेत. माझी लढाई वैचारिक आहे आणि ती भाजपशी आहे. कुणीही काहीही विधान करत असेल तो त्यांना अधिकार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT