Supriya Sule Husband Sadanand Sule criticizes Chandrakant Patil and BJP over kichen remark  
महाराष्ट्र बातम्या

'ते स्त्री द्वेष्टे' म्हणत सुप्रिया सुळेंच्या पतीची चंद्रकांत पाटलांवर टीका

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे, दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, त्यावरून दरम्यान सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाषेवरून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत, हा सर्व महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी हे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंबद्दल काय बोलत होते याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांनी लिहीले की हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुप्रिया यांच्याबद्दल बोलत आहेत, मी मानत आलो आहे की, ते (भाजप) स्त्रियांचा द्वेश करणारे आणि त्यांना शक्य असेल तेथे खाली खेचणारे आहेत...मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे जी घर सांभाळणारी, एक आई आणि एक यशस्वी राजकारणी, तसेच अनेक मेहनती आणि गुणवान महिलांपैकी आहे. ... त्यांचे वक्तव्य हे सर्व महिलांचा अपमान करणारे आहे" असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा वाल केंद्र सरकारला विचारणार आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्य होत्या. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही असे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Kolhapur Crime News : कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा! किरकोळ वादातून दोन निर्घृण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

Beed News: घरकुल घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; केज येथील ‘सकाळ’ने उघड केलेला सव्वाचार कोटींचे प्रकरण

Nashik Highway: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली; वाहनचालकांसह प्रवासी संतापले, टोल भरूनही त्रास!

Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT