supriya sule on deepak kesarkar statement to ajit pawar politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणतात, अजित पवार राजकारणातील ‘अमिताभ बच्चन'!

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना टोला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राजकारणात ज्या नेत्याचा दबदबा असतो त्याच नेत्यावर विरोधक टीका करतात, असा दावा करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला.

सिनेसृष्टीत अमिताभ बच्चन सर्वांनाच आपापल्या चित्रपटात हवे असतात. सर्वांनाच अमिताभ बच्चन यांचा आवाज चालतो, त्यांचा फोटो, लुकदेखील चालतो. एवढंच काय पण त्यांची सही ऑटोग्राफ म्हणूनही चालते. त्यामुळेच अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारण सर्वांनाच आपापल्याकडे हवे असतात. त्यामुळेच, अजित पवार राज्याच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर लगावला.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आज सुप्रिया सुळे प्रथमच पक्षाच्या मुख्यालयात आल्या होत्या. यावेळी ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की, पक्षाने कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. पण, आपण सगळेच एक परिवार म्हणून एकत्र आहोत.

एखाद्या घरात लग्न असले की कोणी एकटाच धावपळ करत नाही, प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे पक्ष म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आहोत. हे काम करत असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत.

लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदर तपासूनच सुरुवात केली आहे. त्याबाबत अनेक बैठकाही सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वानुमते निर्णय होईल. असेही त्यांनी सांगितले.

केंद्र, राज्य सरकार महिलांबद्दल असंवेदनशील

दरम्यान, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत खंत व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र व राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंचे प्रकरण ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळले त्याबाबत खंत तर आहेच, पण महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधातील अत्याचाराच्या घटनांमुळे वेदना होतात. या सर्व घटनांना सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT