Supriya Sule news 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: वयाने मोठे आहात नाहीतर करारा जवाब दिला असता, सुप्रिया सुळेंचा भुजबळांना इशारा!

Sandip Kapde

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूर येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाल मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इथं दडपशाही चालत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार गटातील नेत्यांवर देखील निशाणा साधला.

निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे. पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? सत्ताधाऱ्यांमागे दिल्लीतील अदृश्य शक्तींचा हात आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.  

फडणवीसांच्या गाडीला टोल नसेल -

देवेंद्र फडणवीसांचे २.o वास्तवतेपासून दूर आहेत. दौऱ्यात मी सगळीकडे टोल भरते. फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या गाडीला टोल नसेल. देवेंद्र फडणवीस सध्या दु:खी आहेत. त्यांना जास्त त्रास द्यायचा नसतो. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला आहे. भाजपमध्ये ज्यांनी सतरंज्या उचलल्या. ज्यांनी १०५ आमदार निवडून आणले. मात्र त्यांच्या पदरात काहीच नाही पडले. काँग्रेसमुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस विचारांचा मुख्यमंत्री हवा आहे, याचा मला आनंद आहे, असे सुळे म्हणाल्या.

छगन भुजबळ बेलवर -

देवेंद्र फडणवीस असे म्हणतात छगन भुजबळ बेलवर आहेत. भुजबळ आज शरद पवार यांच्यावर सतत टीका करत आहेत. मात्र मी त्यांना उत्तर देणार नाही ते माझ्या वयाचे असते तर करारा जवाब दिला असता.

भाजपा भ्रष्ट जुमला पार्टी -

भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती आता भाजपा नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे. त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले की सर्व आरोप नष्ट होतात. समरजीत घाडगे यांचे ताजे उदाहरण आहे. माझी घाडगेंनी विनंती आहे त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्यांचे पालकमंत्री आहेत. समरजीत घाडगे आणि भाजपने वाशिंग मशिनमध्ये टाकून पालकमंत्री केले हे स्पष्ट करा. नाहीतर आरोप खोटे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT